Saturday, November 30, 2013

"मंगल" ही "मंगल"





काल मध्यरात्रीनंतर आपल्या 'MOM'ने शब्दश: गरुडभरारी , नव्हे त्याहीपेक्षा मोठी भरारी, मंगळाच्या दिशेने घेतली.
आपला भारत खरोखरच अजब रासायन आहे .आपल्या  देशात काही वर्षापूर्वी एका प्रख्यात अभिनेत्रीच्या विवाहासमयी,  'मंगळ ' दोष म्हणून आला आणि  त्यासाठी  खास उपाय योजले गेले(तेव्हा अनेक तरुण चाहत्यांना  पिंपळ-वड या झाडांचा मत्सर वाटला होता ..  ); इतरही अनेकांच्या 'कुंडलीत ' ' मंगळदोष' , म्हणजे फार मोठी अडचण समजल्या जाते . तोच भारत आज स्वत:च मंगळाच्या दिशेने झेपावत आहे, त्याला आपल्या कवेत घेण्यासाठी... काय म्हणावे ?? बहुधा आपला देश यासाठीच इतरांहून वेगळा आहे … आपल्या इथे अनेक अद्वैती  झाले , द्वैती झाले … सांख्यवादी , पुर्णतावादी , शून्यवादी , जडवादी आणि कितीतरी ,  पण भारताने साऱ्यांनाच आश्रय व उत्तेजन दिले … मला तर एका  जन्मात भारत समजणे शक्य शक्य दिसत नाही ; जर देव माझे facebook status वाचत असेल आणि पुनर्जन्म वगैरे खरे असेल तर त्याने मला सलग मनुष्य-जन्म द्यावे व याच भूमीत द्यावे … "कुछ तो 'जान' पाओगे "...
*********************************************************************************
सकाळी इस्रोची बातमी FBवर वाचली … रात्री post केली होती …स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंचे पहीले (रात्री १२ चे )भाषण आठवले …"At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to freedom (in  interplanetary space ). A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new(माझ्या वरील लिखाणाचा संदर्भ !!), when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance.…".
*********************************************************************************