Sunday, December 29, 2013

जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने.....


काल आमच्या senior मैत्रिण- रूचा जोशी उच्च-शिक्षणासाठी परदेशास रवाना झाल्या. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला फार कौतुक आणि अप्रूप वाटतं-परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल... ३ वर्षांपूर्वी पुण्यास येतेसमयी आम्ही केलेली मानसिक कसरत आठवली..... घरापासून दूर कसे राहणार? मित्र कसे असतील? वगैरे.... या पार्श्वभूमिवर परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल आदर वाटतो... आदर द्विगुणित होतो, जेव्हा एकटी जाणारी व्यक्ति स्त्री असते. एकटे जाण्याचे धैर्य कसेकाय एकवटता, त्याच जाणोत....
असो. (जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने मला लिहायला आयते भांडवल मिळाले.)
सुंदर योगायोग आहे-
१००-१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ- पुणेच. एक नवपरिणीत ब्राम्हण जोडपं... आधुनिकतावादी श्रीमान व त्याकाळास अनुकूल गृहलक्ष्मी...अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा ! पण, या नारायणाचे विचार वेगळेचत्याचे मनी, आपल्या रमेस गृहलक्ष्मीच बनवून न ठेवता अश्विनीकुमार बनविण्याचे ध्येय... आपल्या पतीच्या पाठबळावर, प्रस्थापितांविरुद्ध उभी राहणारी ही स्त्री म्हणजे सौ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. शनिपाराजवळ त्यांचं घर होतं. सौ.जोशी पुढे विलायतेस गेल्या. शिक्षण पूर्ण केले व भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. सौ.जोशींचा लढा दोन ओळींत संपावा, असा नाहीच! शाब्दिक चिखलफेक व भौतिक शेणफेक हे प्रकार त्यांनीही सोसले. पण आपले व्रत सोडले नाही....
आज त्याच पुण्यातून, कु.जोशींना परदेशासाठी मार्गस्थ होताना पाहून सौ.जोशींना नक्कीच आनंद झाला असणार!!!
काळरूपी वारू चौखुर उधळीत, आज, या टप्प्यावर आपल्यासर्वांसह येऊन पोहचले आहे, की कोण-कुठला कल्पेश, जाहिररित्या
जोशींच्या परदेशगमनाची स्तुति करतो आहे.... त्याकाळी असे काही लिहिले असते, तर जोशींनंतर कोठाळेंना नक्कीच वाळीत टाकण्यात आले असते!!! यास्तव असे मनापासून वाटते की, आजचे आपले स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगताना, त्याकरिता कष्ट सोसलेल्या असंख्य व्यक्तिंबद्दल, आपण कृतज्ञ असावे. तेही कठीण वाटत असल्यास, कमीतकमीकृतघ्नतरी होऊ नये. (जैसे सुचले, तैसे अंकिले.)
        

Saturday, December 28, 2013

CHRISTMAS


-the day when everyone waits for Santa, to receive gifts.... In my childhood, even I used to wait for him (though we practice and follow Hinduism, at home.)At that time, I used to thought that Santa might be having the list of Christian Children only. But, I never gave a hope. In 8th/9th standard we even planned to post a letter to Finland, as we read somewhere that it was the nearest post office to north-pole. But, it didn't worked.
Years later, I think, I got my answer(CITATION REQUIRED) ... My point was Santa addresses to Christian children only.... I would like to tell you my (?) answer to you, "Does the Sun shines only for the Christians, or only for Hindus, or Muslims?? No!! It shines for everyone, who dares to open his/her eyes and come out of the house. You need not to be a Christian to meet 'your' 'Santa'.
Basically, What is a Santa Claus?? Its person, an idea, a thought which encourages you, inspires you to do good things in your life. It need not to be a fat man with cotton-white beard and red uniform!! Santa will definitely meet you when you learn to share happiness with people around you, with people unknown to you. When you have the courage to share a half bread with an empty stomach!!!
People say that Santa is real (?), I don't know. I haven't met him yet..... I think Santa expect more good things to be done by me. He expects from me, to serve for my friends, society, Nation & entire Humanity in a much broader perspect.
"Dear Santa, I am on 'it'. And, while I will be working in that direction I will be waiting for you..."
So, Friends go and find your Santa .... 

Saturday, December 14, 2013

नव्या कायद्याच्या निमित्ताने ........

अनेक प्रश्न माझ्या रिकाम्या डोक्यात उसळी मारत आहेत -
१. लिंबू-मिरची : ही वस्तू जशी जादूटोण्या संबंधात सर्रास वापरली जाते, तशीच ती अनेक घर, दुकाने यांवरही लटकताना आढळते.   आमच्या घरीसुद्धा !! रस्त्यावर, सिग्नलवर अनेक स्त्रिया डझनाने 'लिंबू-मिरची' विकताना दिसतात. आता हे सर्व गुन्हेगार समजल्या जाणार का ?? (घरी आधी कळवावे लागेल….)
२. बाहुली : काळ्या रंगाची बाहुली , अनेक प्रतिष्ठानांवर उलटी लटकत असते. लहानपणी अशीच एक बाहुली उलटी लटकलेली बघून, मी सरळ लटकावली, तर त्या माणसाने मला चांगले 'लटकावल्याचे' मला चांगलेच आठवते. तर, तो माणूसही आता गुन्हेगार का ? काळ्या बाहुल्यांची आता 'शिर्षासनातून' मुक्तता होणार का ?
३.  अंगात येणे : मला नेहमीच या वर्गाची भीती वाटायची आणि वाटते. मी एकदा एकास विचारले "तुमच्याच अंगात देव कसा येतो हो ?" त्यावर उत्तर मिळाले- "देवाच्या इच्छेनुसार … ". कोणीतरी देवाकडे या कायद्याची प्रत पोहचवा… नाहीतर देव येउन निघून जातील आणि बिचारा माणूस लटकेल.
४. गाडी व यंत्रांची पूजा : हे कोण बंद करणार ? यंत्रांना नीट तेल-पाणी मिळाले तर ते नीट चालतीलच ना ? गाडीला योग्य वेळेवर maintenance केला, तर तीही नीट चालेल. मग त्यांची पूजा करण्यात काय अर्थ ? ही अंधश्रद्धा नाही का ?
५. बळी देणे : आता बहुतेक ठिकाणी प्राण्यांचा बळी दिला जात नाही. काही वर्षांपूर्वी मी व माझा लहान भाऊ नवमीच्या होमला उपस्थित होतो. त्यात  'बळी' द्यायचि  म्हणून कोहळा कापला होता . ही अंधश्रद्धा कोण आणि कशी घालावणार ???
६. एका माणसाने आपला जीव दिल्यानंतरच ('बळी' दिल्यानंतर…?) कायदा करणारे  सरकार अंधश्रद्ध नाही का ? (दाभोळकर या वाक्यावर मला नक्की शिव्या घालतील. sorry 'सर')
७. चहा : रस्त्यावर सकाळी- सकाळी चहा ओतणे , यावर काय वाटते ?
८. श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय, हे पुढच्या पिढीला कसे समजावणार ???
९. राशी-भविष्य : आजचे भविष्य बघताना आपण कोणातरी अतिमानवी शक्ती वर विश्वास टाकतो. ही  अंधश्रद्धा ….
 १०. आम्ही अनेक Hollywood / चित्रपट पाहतो , त्यातून होणाऱ्या अंधश्रद्धेचा मारा कसा थोपवावा ??? का आता असे चित्रपट Ban होणार ? चित्रपट करमणुकीसाठी असतात, (माहिती आहे !) पण, चित्रपट पाहिल्यावर आपण तसा विचार करतोच ना !!!…. "कॉन्जुरिंग "… "राज "… इत्यादी….   .................................................................................................................................................................

Friday, December 13, 2013

You are a Mathematician if:
1)You use "without loss of generality" & "if & only if " in your conversation; 
2)When immersed in thought you reach out for a used envelope & a pencil to scribble some steps; 
3)You frown on the approximations made by Physicists & Engineers; 
4)You read " fog" as "ef o jee";
5)You cannot do simple arithmetical calculations;
6)The moment of revelation of a proof is the moment of bliss for you.
....... श्री. बोपर्डीकर सर यांचे facebook वरील स्थितिमान (status update )

Thursday, December 12, 2013

'नोट' बद्दल 'नोट'

आज सकाळी PMTच्या बसने प्रवासाचा योग आला. राजाराम पुलाजवळ बस पकडली व कॉलेजला येण्यास निघालो. सकाळची वेळ, त्यात थंडी, यामुळे बस रिकामीच होती.
वाहक/ कंडक्टर काका शेजारच्या seatवर बसले होते. मी त्यांना कॉलेजचे तिकीट मागितले. '१० रुपये झाले' म्हणत त्यांनी मला  तिकीट दिले. मी पाकिटात कोंबलेली ५० रुपयाची नोट काढून त्यांना दिली. नोट नवीन होती, पण जबरदस्तीने योगासन करणाऱ्याप्रमाणे तिला तीन-चार घड्या पडलेल्या होत्या. 'काकांनी' माझ्याकडून नोट घेतली, मी ४० परत घेण्याच्या तयारीत… त्यांनी माझ्याकडे पाहत, त्या नोटेला घडी-मुक्त केले, तिचे योगासन सोडवले. स्मित करीत म्हणाले
       "चांगली नोट खराब होते रे … "
=======================================================================
========================================================================
 प्रसंग अगदीच छोटा. जेवढा वेळ लिहिण्यास लागला, तेवढ्यात दोनवेळा घडेल. पण, एक नवीनच धडा देऊन गेला. फाटकी नोट सगळ्यांनाच  नको असते. पण, आपण चांगल्या नोटेची तरी काळजी घेतो का ? हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या चलनाचा अपमान हा संवैधानिकदृष्ट्या गुन्हा आहे. मग आपणच त्या नोटा बेजबाबदारपणे का वापरतो ? असा विचार केला आणि  लक्षात आले कि, फाटक्या नोटा 'निर्माण' करणे is equivalent to नकली नोटा चालवणे. नकली नोटा अर्थव्यवस्थेत पैसा आहे असे मृगजळ निर्माण करतात, तर फाटक्या नोटांची विल्हेवाट लावावी लागते. तेव्हा पैसा जपून वापरणे जेवढे महत्त्वाचे , तेवढेच  काळजीपूर्वक हाताळणेसुद्धा.  

Thursday, December 5, 2013

" मादीबा "

काल  मादीबा आपल्याला सोडून गेला.…
आम्हाला ८ वी - ९ वी पर्यंत मादिबा माहितच नव्हता.
 मादीबाबद्दल माहिती झाली ती कपिल देव संबंधित वाचनातून….
कपिल त्यांना आपला role-model मानायचा.
मग मादिबा शोधून काढला. थोडासाच वाचला … तसेही थोर व्यक्तित्व समजणे कठीणच !!
वर्णद्वेषी व्यवस्था उखडून टाकण्याचे कार्य त्यांनी केले. त्याचे महत्त्व आपल्याला कळणे जरा कठीणच कारण आपल्या नशिबी (सुदैवाने) ती नव्हती.
मादीबाने वयाची ९५ पैकी २७ वर्षे तुरुंगात घालवली. तिथे ८ फूट रुंदीची त्यांची कोठडी होती. या काळात त्यांना सहा महिन्यातून एकदा व्यक्तिभेट व एक पत्र मिळण्याची मुभा होती. (सकाळ झाल्यावर अंगाला पाणी लागण्यापूर्वी, FBत डुंबणाऱ्या आपल्याला  , मलातरी त्याची भयाणता चांगलीच कळेल. ) चुनखडी च्या खाणीत कामावर असताना गोऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविनेत्रे (sunglasses ) वापरू दिली नाहीत; त्यामुळे मादीबाची दृष्टी अंधुक झाली. २७ वर्षे तुरुंगवास, गोऱ्यांकडून मिळणारी वर्णद्वेषी वागणूक यासर्व आव्हानांना तोंड देत मादिबाने वर्णद्वेष आफ्रिकेतून हद्दपार केला.
 "महात्म्या"ने सुरु केलेला लढा "मादिबा"ने पूर्ण केला. दोघेही आपल्या देशाचे " ताता "- पिता झाले.
दहा वर्षांपूर्वी मादीबाने "निवृत्तीतीतून निवृत्तीची " घोषणा केली व आपल्या लेकरांना देश सांभाळण्याची जबाबदारी… त्यांचे शब्द होते "dont call me, I  will  call you ".
======================================================================
लेख लिहिताना माझे मन "उगाचच" खदखदत होते- का लिहू मी या बाबाबद्दल? जो मिश्किलपणे हसत मला कोड्यात टाकायचा . आज लक्षात आले कि हा माणूस  "आपला" का वाटतो -  मादीबाने गांधींचा वारसा/ व्रत स्वीकारले; ते कार्य पूर्णत्वास नेले.  आणि कष्ट सोसले, संयमी वृत्ती अंगिकारली ती  आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे !
 मादिबाला भारत-रत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भारत-रत्नाने भारताच्या सीमा ओलांडल्या. आम्ही इतर देशातील व्यक्तींचा सन्मान करू लागलो … पण आपल्याच "वीरांना" विसरलो…नाही का ???
*********************************************************************************

Tuesday, December 3, 2013

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला


१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.
१४ विद्या
४ वेद + ६ वेदांगे + न्याय + मीमांसा + पुराणे + धर्मशास्त्र…. अश्या एकूणचौदा
वेद : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
सहा वेदांगे : १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
           २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
           ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
           ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
           ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
           ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.
 न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्र.
=========================================================
चौसष्ट कला
१. पानक रस तथा रागासव योजना मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे

 यापैकी आपण किती आत्मसात करू, हा प्रत्येकाच्या चिंतनाचा विषय व्हावा.