आज सकाळी PMTच्या बसने प्रवासाचा योग आला. राजाराम पुलाजवळ बस पकडली व कॉलेजला येण्यास निघालो. सकाळची वेळ, त्यात थंडी, यामुळे बस रिकामीच होती.
वाहक/ कंडक्टर काका शेजारच्या seatवर बसले होते. मी त्यांना कॉलेजचे तिकीट मागितले. '१० रुपये झाले' म्हणत त्यांनी मला तिकीट दिले. मी पाकिटात कोंबलेली ५० रुपयाची नोट काढून त्यांना दिली. नोट नवीन होती, पण जबरदस्तीने योगासन करणाऱ्याप्रमाणे तिला तीन-चार घड्या पडलेल्या होत्या. 'काकांनी' माझ्याकडून नोट घेतली, मी ४० परत घेण्याच्या तयारीत… त्यांनी माझ्याकडे पाहत, त्या नोटेला घडी-मुक्त केले, तिचे योगासन सोडवले. स्मित करीत म्हणाले
"चांगली नोट खराब होते रे … "
=======================================================================

========================================================================
प्रसंग अगदीच छोटा. जेवढा वेळ लिहिण्यास लागला, तेवढ्यात दोनवेळा घडेल. पण, एक नवीनच धडा देऊन गेला. फाटकी नोट सगळ्यांनाच नको असते. पण, आपण चांगल्या नोटेची तरी काळजी घेतो का ? हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या चलनाचा अपमान हा संवैधानिकदृष्ट्या गुन्हा आहे. मग आपणच त्या नोटा बेजबाबदारपणे का वापरतो ? असा विचार केला आणि लक्षात आले कि, फाटक्या नोटा 'निर्माण' करणे is equivalent to नकली नोटा चालवणे. नकली नोटा अर्थव्यवस्थेत पैसा आहे असे मृगजळ निर्माण करतात, तर फाटक्या नोटांची विल्हेवाट लावावी लागते. तेव्हा पैसा जपून वापरणे जेवढे महत्त्वाचे , तेवढेच काळजीपूर्वक हाताळणेसुद्धा. .jpg)
No comments:
Post a Comment