काल मादीबा आपल्याला सोडून गेला.…
आम्हाला ८ वी - ९ वी पर्यंत मादिबा माहितच नव्हता.
मादीबाबद्दल माहिती झाली ती कपिल देव संबंधित वाचनातून….
कपिल त्यांना आपला role-model मानायचा.
मग मादिबा शोधून काढला. थोडासाच वाचला … तसेही थोर व्यक्तित्व समजणे कठीणच !!
वर्णद्वेषी व्यवस्था उखडून टाकण्याचे कार्य त्यांनी केले. त्याचे महत्त्व आपल्याला कळणे जरा कठीणच कारण आपल्या नशिबी (सुदैवाने) ती नव्हती.
मादीबाने वयाची ९५ पैकी २७ वर्षे तुरुंगात घालवली. तिथे ८ फूट रुंदीची त्यांची कोठडी होती. या काळात त्यांना सहा महिन्यातून एकदा व्यक्तिभेट व एक पत्र मिळण्याची मुभा होती. (सकाळ झाल्यावर अंगाला पाणी लागण्यापूर्वी, FBत डुंबणाऱ्या आपल्याला , मलातरी त्याची भयाणता चांगलीच कळेल. ) चुनखडी च्या खाणीत कामावर असताना गोऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविनेत्रे (sunglasses ) वापरू दिली नाहीत; त्यामुळे मादीबाची दृष्टी अंधुक झाली. २७ वर्षे तुरुंगवास, गोऱ्यांकडून मिळणारी वर्णद्वेषी वागणूक यासर्व आव्हानांना तोंड देत मादिबाने वर्णद्वेष आफ्रिकेतून हद्दपार केला.
"महात्म्या"ने सुरु केलेला लढा "मादिबा"ने पूर्ण केला. दोघेही आपल्या देशाचे " ताता "- पिता झाले.
दहा वर्षांपूर्वी मादीबाने "निवृत्तीतीतून निवृत्तीची " घोषणा केली व आपल्या लेकरांना देश सांभाळण्याची जबाबदारी… त्यांचे शब्द होते "dont call me, I will call you ".
======================================================================
लेख लिहिताना माझे मन "उगाचच" खदखदत होते- का लिहू मी या बाबाबद्दल? जो मिश्किलपणे हसत मला कोड्यात टाकायचा . आज लक्षात आले कि हा माणूस "आपला" का वाटतो - मादीबाने गांधींचा वारसा/ व्रत स्वीकारले; ते कार्य पूर्णत्वास नेले. आणि कष्ट सोसले, संयमी वृत्ती अंगिकारली ती आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे !
मादिबाला भारत-रत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भारत-रत्नाने भारताच्या सीमा ओलांडल्या. आम्ही इतर देशातील व्यक्तींचा सन्मान करू लागलो … पण आपल्याच "वीरांना" विसरलो…नाही का ???
*********************************************************************************

No comments:
Post a Comment