Saturday, December 14, 2013

नव्या कायद्याच्या निमित्ताने ........

अनेक प्रश्न माझ्या रिकाम्या डोक्यात उसळी मारत आहेत -
१. लिंबू-मिरची : ही वस्तू जशी जादूटोण्या संबंधात सर्रास वापरली जाते, तशीच ती अनेक घर, दुकाने यांवरही लटकताना आढळते.   आमच्या घरीसुद्धा !! रस्त्यावर, सिग्नलवर अनेक स्त्रिया डझनाने 'लिंबू-मिरची' विकताना दिसतात. आता हे सर्व गुन्हेगार समजल्या जाणार का ?? (घरी आधी कळवावे लागेल….)
२. बाहुली : काळ्या रंगाची बाहुली , अनेक प्रतिष्ठानांवर उलटी लटकत असते. लहानपणी अशीच एक बाहुली उलटी लटकलेली बघून, मी सरळ लटकावली, तर त्या माणसाने मला चांगले 'लटकावल्याचे' मला चांगलेच आठवते. तर, तो माणूसही आता गुन्हेगार का ? काळ्या बाहुल्यांची आता 'शिर्षासनातून' मुक्तता होणार का ?
३.  अंगात येणे : मला नेहमीच या वर्गाची भीती वाटायची आणि वाटते. मी एकदा एकास विचारले "तुमच्याच अंगात देव कसा येतो हो ?" त्यावर उत्तर मिळाले- "देवाच्या इच्छेनुसार … ". कोणीतरी देवाकडे या कायद्याची प्रत पोहचवा… नाहीतर देव येउन निघून जातील आणि बिचारा माणूस लटकेल.
४. गाडी व यंत्रांची पूजा : हे कोण बंद करणार ? यंत्रांना नीट तेल-पाणी मिळाले तर ते नीट चालतीलच ना ? गाडीला योग्य वेळेवर maintenance केला, तर तीही नीट चालेल. मग त्यांची पूजा करण्यात काय अर्थ ? ही अंधश्रद्धा नाही का ?
५. बळी देणे : आता बहुतेक ठिकाणी प्राण्यांचा बळी दिला जात नाही. काही वर्षांपूर्वी मी व माझा लहान भाऊ नवमीच्या होमला उपस्थित होतो. त्यात  'बळी' द्यायचि  म्हणून कोहळा कापला होता . ही अंधश्रद्धा कोण आणि कशी घालावणार ???
६. एका माणसाने आपला जीव दिल्यानंतरच ('बळी' दिल्यानंतर…?) कायदा करणारे  सरकार अंधश्रद्ध नाही का ? (दाभोळकर या वाक्यावर मला नक्की शिव्या घालतील. sorry 'सर')
७. चहा : रस्त्यावर सकाळी- सकाळी चहा ओतणे , यावर काय वाटते ?
८. श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय, हे पुढच्या पिढीला कसे समजावणार ???
९. राशी-भविष्य : आजचे भविष्य बघताना आपण कोणातरी अतिमानवी शक्ती वर विश्वास टाकतो. ही  अंधश्रद्धा ….
 १०. आम्ही अनेक Hollywood / चित्रपट पाहतो , त्यातून होणाऱ्या अंधश्रद्धेचा मारा कसा थोपवावा ??? का आता असे चित्रपट Ban होणार ? चित्रपट करमणुकीसाठी असतात, (माहिती आहे !) पण, चित्रपट पाहिल्यावर आपण तसा विचार करतोच ना !!!…. "कॉन्जुरिंग "… "राज "… इत्यादी….   .................................................................................................................................................................

No comments:

Post a Comment