Sunday, December 29, 2013

जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने.....


काल आमच्या senior मैत्रिण- रूचा जोशी उच्च-शिक्षणासाठी परदेशास रवाना झाल्या. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला फार कौतुक आणि अप्रूप वाटतं-परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल... ३ वर्षांपूर्वी पुण्यास येतेसमयी आम्ही केलेली मानसिक कसरत आठवली..... घरापासून दूर कसे राहणार? मित्र कसे असतील? वगैरे.... या पार्श्वभूमिवर परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल आदर वाटतो... आदर द्विगुणित होतो, जेव्हा एकटी जाणारी व्यक्ति स्त्री असते. एकटे जाण्याचे धैर्य कसेकाय एकवटता, त्याच जाणोत....
असो. (जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने मला लिहायला आयते भांडवल मिळाले.)
सुंदर योगायोग आहे-
१००-१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ- पुणेच. एक नवपरिणीत ब्राम्हण जोडपं... आधुनिकतावादी श्रीमान व त्याकाळास अनुकूल गृहलक्ष्मी...अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा ! पण, या नारायणाचे विचार वेगळेचत्याचे मनी, आपल्या रमेस गृहलक्ष्मीच बनवून न ठेवता अश्विनीकुमार बनविण्याचे ध्येय... आपल्या पतीच्या पाठबळावर, प्रस्थापितांविरुद्ध उभी राहणारी ही स्त्री म्हणजे सौ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. शनिपाराजवळ त्यांचं घर होतं. सौ.जोशी पुढे विलायतेस गेल्या. शिक्षण पूर्ण केले व भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. सौ.जोशींचा लढा दोन ओळींत संपावा, असा नाहीच! शाब्दिक चिखलफेक व भौतिक शेणफेक हे प्रकार त्यांनीही सोसले. पण आपले व्रत सोडले नाही....
आज त्याच पुण्यातून, कु.जोशींना परदेशासाठी मार्गस्थ होताना पाहून सौ.जोशींना नक्कीच आनंद झाला असणार!!!
काळरूपी वारू चौखुर उधळीत, आज, या टप्प्यावर आपल्यासर्वांसह येऊन पोहचले आहे, की कोण-कुठला कल्पेश, जाहिररित्या
जोशींच्या परदेशगमनाची स्तुति करतो आहे.... त्याकाळी असे काही लिहिले असते, तर जोशींनंतर कोठाळेंना नक्कीच वाळीत टाकण्यात आले असते!!! यास्तव असे मनापासून वाटते की, आजचे आपले स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगताना, त्याकरिता कष्ट सोसलेल्या असंख्य व्यक्तिंबद्दल, आपण कृतज्ञ असावे. तेही कठीण वाटत असल्यास, कमीतकमीकृतघ्नतरी होऊ नये. (जैसे सुचले, तैसे अंकिले.)
        

No comments:

Post a Comment