Wednesday, April 16, 2014

GAMES OF THRONESच्या निमित्ताने…


HBOया वाहिनीवरुन GAMES OF THRONES या मालिकेच्या तिसर्या पर्वातील दुसरा भाग प्रक्षेपित झाला अन् FaceBookवर प्रतिक्रियांचा ओघ सुरु झाला. यात आमचीही थोडी भर… एकूणच सात राज्यांची सिंहासनासाठीच्या ‘लढ्या’ची ही कथा… (त्यातील बिभत्सता वगळता)एक रंजक कथेची अर्हता प्राप्त… George Martin लिखित A Song of ice & Fireया कादंबरीमालिकेची त्याला बैठक आहे…..
स्तुति पुरे.. तर, मुद्दा असा की, Benioff व Weiss यांनी GAMES OF THRONES जगभरात लोकप्रिय केली, भारतात अशी मालिका का बनू नये???
आमच्याकडे कथा तयार आहे- महाभारत!!!
-GOTच्या कथेत केवळ सिंहासन हाच उद्देश, पण महाभारतात, त्यापुढे, जाऊन अनागोंदी संपवणे हा उद्देश आहे….
-जादु/काल्पनिकता दोहोंतही आहे, (माझ्या मते तर, महाभारत इतिहासच!) किती दाखवायची, हे आपल्या हातात आहे.
- ‘बिभत्सता’ हा काही कळिचा मुद्दा असतो, असे वाटत नाही. त्यास्तव, कपड्यांची कपात करु नये.. मालिका चलेगी..
- महाभारतात १८ पर्व आहेतच (Readymade), २ पर्व = १ Season असे केले तरी चालेल..

आता तुम्ही म्हणणार - “महाभारत आधीच बनवलंय…”, ओs आपण जागतिक पातळीवर प्रक्षेपणाच्या गोष्टी करीत आहोत… - How can we explain the non-Indian audience, how the arrows from opposite site hit each other at single point, that too apex of the arrow? आतापर्यंतचे महाभारत त्यामुळेच पडलेत धूळ खात. Star-Plusकृत महाभारतात तर व्यक्तिंपेक्षा मुकूट व वेषभूषाच अधिक अधोरेखित होतात… त्याबाबतीत पीटर ब्रुक्स-कृत फ्रेंच भाषेतील महाभारत(!) आजही आठवते… काय वाटतं ?? कुणी करणार का असा प्रयत्न ?? कुणी आपला नक्कीच करणार, पण, त्यासाठी आपल्याला आपला “देवभोळेपणा” (!!) थोडावेळ गुंडाळून ठेवावा लागेल… (हीच सगळ्यात मोठी अडचण वाटते आहे.) (प्रतिक्रिया…)